केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

केंद्र सरकारने घोषणा केलेल्या १८ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत कोव्हीड लस अमृत महोत्सव अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस टोचण्याच्या मोहिमेची सुरुवात पालघर जिल्ह्यात झाली असून शुक्रवार दिनांक १५/७/२०२२ रोजी
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य विनया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

महामार्गालगतच्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस, ३० जणांना कोव्हीशिल्ड तर २० जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली.

कोरोना अजून पूर्णपणे आटोक्यात आला नसून मोफत कोरोना प्रतिबंधक मोफत बूस्टर लस प्रत्येकाने टोचून घ्यावी व कोरोना चा प्रादुर्भाव टाळावा असे आवाहन यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी केले.

या मोहिमेत १५ जुलै पासून येणाऱ्या ७५ दिवसांपर्यंत मोफत बूस्टर डोस नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण, दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा सेविका,गट प्रवर्तक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *