
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी हद्दीत विरार सर्वे नंबर 86 या नवीन शर्तीच्या आदिवासी भूखंडावर 4 अनधिकृत इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले असून सदर बांधकामे निष्कासित करून भूमाफियांवर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत जिकडे तिकडे अनधिकृत बांधकामे पहावयास मिळतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संरक्षणात हि बांधकामे होतात. गाव मौजे विरार सर्वे नंबर 86 या आदिवासी नवीन शर्तीच्या भूखंडावर 4 भव्य अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे ही महानगरपालिका अधिकारी व महसूल विभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र या अधिकाऱ्यांच्या संरक्षणात ही बांधकामे होतात. अधिकाऱ्यांना लाच दिल्याशिवाय एक ही बांधकाम होत नाही.
धनेश जाधव, अशोक तिवारी व योगेश तिवारी या भूमाफियांनी अधिकाऱ्यांना मैनेज करून सदरची बांधकामे केलेली आहेत. तरी सदरची अनधिकृतबांधकामे निष्कासित करून भूमाफियांवर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.


