वसई दि. 18 : वसई न्यायालयात दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138 एन. आय अॅक्ट चेक संबधीची अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बैंक वसूली प्रकरणे मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे महसूली प्रकरणे तसचे दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षकारांना आवाहान करण्यात येत आहे की, त्यांनी सदरील संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत तालुका विधी सेवा समिती, वसई यांचेकडे संपर्क साधून अर्ज करावा.
सर्व पक्षकारानी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरीता व आपले दुरावलेले संबंध पूर्नस्थापीत करणेसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन. जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, डॉ. सुधीर देशपांडे, यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *