
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते व मा आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व विदर्भातील शेतकरी अस्मानी अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आला आहे अगोदरच कर्जबाजारी त्यात कर्ज घेऊन पेरण्या केल्या परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके वाहून गेली काही शेत्यांमध्ये नदीतील रेती वाहून आली तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी रू 1000 कोटींचे पॅकेज जाहीर करावे व त्यांच्या खात्यात जमा करावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मा आमदार प्रकाश गजभिये यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली व हिलटॉप येथील सदाशिव अपार्टमेंट येथील आगीमध्ये नुकसान झालेल्याना मा मुख्यमंत्री निधीतून खास बाब म्हणून आर्थिक मदत करावी सौ सुप्रिया वखरे यांचे रू 1000000/- दहा लाख रुपयाचे नुकसाiन झाले त्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी मा आमदार प्रकाश गजभिये यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली व त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल व सौ सुप्रिया वखरे यांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले
