भाजप वसई अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांची मागणी

प्रतिनिधी

विरार- वसई-विरार महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेला पालिका अधिकारी व ठेकेदार कारणीभूत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करतानाच; ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशा स्वरूपाची मागणी भाजप वसई अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ शेख यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे. शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून विशेषकरून प्रभाग समिती ‘एचव ‘आयमधील रस्त्यांकडे लक्ष वेधले आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पालिकेकडून दुरुस्त केले जात नसल्याने हे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वृद्ध नागरिक, लहान मुले व महिलांना रस्त्यांतून चालताना त्रास सहन करावा लागत आहे.

पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून या रस्त्यांची वेळोवेळी पाहणी होत नसल्यानेच त्यांच्यामार्फत झालेले काम निकृष्ट व हलक्या दर्जाचे झालेले आहे. याचे परिणाम म्हणून महापालिका क्षेत्रातील रस्ते थोड्याच कालावधीत खराब झालेले आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात यावा. त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तर या ठेकेदारांना पाठिशी घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तसनीफ शेख यांनी केली आहे.
………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *