
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे होत आहेत आणि विशेष म्हणजे भूमाफिया अगदी बिनधास्तपणे जाहिरात करून या घरांची विक्री करीत आहेत. (MSG बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आरोही रियल्टी,देवांश रियल्टी,गौरव बिल्डर अँड डेव्हलपर्स,सुंदरम बिल्डर अँड डेव्हलपर्स)
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी हद्दीत वाघराल पाड्यात हजारोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे झाली आहेत. विशेष म्हणजे डोंगर तोडून ही बांधकामे झाली आहेत. शासन-प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच खाऊन या अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले आहे. याच ठिकाणी घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २ जखमी झाले. याच ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामांतील खोल्या व गाळे विक्री करिता भूमाफिया चक्क जाहिराती करीत आहेत. पम्प्लेट छापून जाहिरात बेधडकपणे अनधिकृत बांधकामांमधील घरे व गाळे विकले जात आहे. लोक ही बिनधास्तपणे घरे व गाळे खरेदी करीत आहेत. लोकांची ही चूक आहे, घर खरेदी करताना सदरची जागा शासकीय आहे की मालकी आहे, बांधकामाला परवानगी आहे की नाही याचा कोणताही विचार लोक करीत नाहीत. महानगरपालिका अधिकारी, महसूल अधिकारी ही मस्तपैकी लाच खाऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतात. शासनाकडून या प्रकरणी कठोर कारवाई व्हायला पाहिजे. शासनातील अधिकाऱ्यांचेही हात ओले झालेले असतात. बिनधास्तपणे चालू आहे भ्रष्टाचाराचा खेळ!


