
प्रतिनिधी :
वसई तालुक्यातील पोमन ग्राम पंचायत हद्दीतील मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर अवैध माती भराव करण्यात आला असून अनधिकृत बांधकामे चालू आहेत. सदर प्रकरणी वसई तहसील कार्यालयाने कारवाई करावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई तालुक्यातील पोमन ग्राम पंचायत हद्दीतील मोरी सर्वे नंबर 59/15 या 2 एकर भूखंडावर भूमाफिया जावेद मोहसीन खान याने अवैध माती भराव करून अनधिकृत बांधकामे करण्यास सुरुवात केली आहे. सदरची अनधिकृत बांधकामे निष्कासित करून बांधकामे करणाऱ्या व अवैध माती भराव करून शासनाची फसवणूक करणाऱ्या जावेद मोहसीन खान याच्यावर फौजदारी कारवाई करा.

