
नंदाखालमधील कार्मेल कॉन्व्हेंट विरार : नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुल या प्रथितयश शाळेने महाराष्ट राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा झकडं घवघवीत यश सम्पादन करून उज्ज्वल परंपरा कायम राखिली आहे. कुमारी अँस्टीन आल्विन क्रास्टो या विद्यार्थिनीने राष्ट्रीय शिष्यवृत्ती पटकावून पालघर जिल्ह्यात प्रथम येण्याच्या मान मिळवला आहे.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलमधून अनुक्रमे ४८ आणि २५ परीक्षार्थी बसले होते. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२ विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी इयत्ता आठवीमधून बसलेल्या ३५ विध्यार्थ्यापैकी २८ विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वच्या सर्व २८ विध्यार्थ्यानी माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. इतकेच नव्हे तर पाचवीच्या कोरिया रानिया जॉय आणि मच्याडो स्मिता मॅक्समिन या विद्यार्थिनींनी तसेच इयत्ता आठवीतील कुमारी अँस्टीन आल्विन क्रास्टो व ब्रिटो जेडेन सॅमसन आणि राड्रिग्स लिओना नेल्सन या विध्यार्थ्यानी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवून शाळेचे नाव उज्जव केले आहे. कुमारी कुमारी अँस्टीन आल्विन क्रास्टो या मुलीने २३२ गुण मिळवून पालघर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबर पालकांच्या प्रोत्साहनाचा देखील मोठा वाटा आहे. विध्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्द्ल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोवियाना आणि मॅनेजर सिस्टर प्रिटीशा यांनी आनंद व्यक्त केला आहे.
व्रतस्थ जीवनाची २५ वर्षे पूर्ण केलेल्या सेंट जोसेफ शाळेच्या माजी विद्यार्थी आणि कार्मेल कॉन्व्हेंटच्या माजी प्रिन्सिपल सुषमा कोरिया आणि अनुभवी शिक्षक फ्रान्सिस डिमेलो तसेच थॉमस डिमेलो व रॉबर्ट लोबो यांचे देखील मोठे योगदान आहे. शाळेच्या दर्जा उंचावण्यात शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याचे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक स्टीफन डिमेलो यांनी सांगितले.