
प्रतिनिधी :
वसई उप निबंधक कार्यालयात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत असून लाच दिल्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत. सहकारी सोसायट्या वार्षिक लेखा परीक्षक अहवाल उप निबंधक कार्यालयाकडे जमा करीत नाहीत. अशा सोसायट्यांवर कारवाई व्हायला हवी. मात्र उप निबंधक कार्यालय भ्रष्टाचाराच्या दलदलीत फ़सलेले असून गैरकृत्यांना पाठीशी घातले जात आहे. उप निबंधक योगेश देसाई, कार्यालयातील अन्य कर्मचारी यांच्या विरुद्ध लोकांच्या असंख्य तक्रारी आहेत. वरिष्ठांनी याची दखल घेऊन उचित कारवाई करावी.
वसई उप निबंधक कार्यालयात अंदाधुंद भ्रष्टाचार चालत असून उप निबंधक योगेश देसाई व कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे लोक त्रस्त आहेत. अनेक सहकारी सोसायट्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत त्यांचे काम नियमानुसार चालत नसून सदर कार्यालयातील अनियमिततेच्या अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयांना गेलेल्या आहेत.
गंगाराम जयराम जाधव नामक 70 वर्षीय खाजगी इसमावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 23/9/2021 रोजी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा (एफआयआर नंबर 335/2021) दाखल केला होता. यात मजेशीर बाब अशी की, खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात योगेश देसाई व अनिल पाटील यांना वगळण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर प्रकरणात सौदेबाजी केल्याचे बोलले जाते.