(आजादी का अमृत महोत्सव) वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. “आझादी का अमृत महोत्सव दौड” व “हर घर तिरंगा” या कार्यक्रमास प्रोत्साहित करणाच्या अनुषंगाने आयुक्तालयात उद्या *दिनांक ३१/७/२०२२रोजी सकाळी ०६:०० वाजता ७५ पोलीस जवान प्रत्येकी १ किलोमीटर राष्ट्रध्वज घेऊन ७५ किलोमीटर तिरंगा रॅली रन * पूर्ण करणार आहेत. सदर तिरंगा रॅली रन *उत्तन पोलीस ठाणे व वसई पोलीस ठाणे या *दोन ठिकाणावरून सुरू होणार असून ती शेवटचे ठिकाण आप्पा ग्राउंड, नवजीवन फाटा, वसई पुर्व* येथे एकूण ७५ किलोमीटर रन पूर्ण करून एकत्र येणार आहे. या दौड मध्ये पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभाग घेणार आहेत.
सदर तिरंगा रॅली रन चा मार्ग भूत बंगला पोलीस चौकी उत्तन- फातिमा माता मंदिर- शिवनेरी बस स्टॉप- परशुराम चौक -गोल्डन नेस्ट- सिनेमॅक्स – सीताराम चौक- सृष्टी चौक सिग्नल- डेल्टा गार्डन चौक- काशिमिरा नाका- घोडबंदर खिंड- काठीयावाडी हॉटेल- रॉयल गार्डन- बापाने ब्रिज -सातिवली खिंड -तुंगारेश्वर ब्रिज व अप्पा ग्राउंड असे असून वसई पोलीस ठाणे येथून सुरू होणाऱ्या शर्यतीचा मार्ग हा वसई पोलीस स्टेशन- पार नाका- खाऊ गल्ली अगरवाल गेट -येस बँक अंबाडी नाका -वसई वाहतूक शाखा कार्यालय- शाहीन ऑटो- बोळींज मस्जिद- जुना विवा कॉलेज- ओस्तवाल शाळा- तुळींज पोलीस ठाणे-विनायक हॉस्पिटल- रेंज नाका- यशोभारती सर्विस सेंटर ते आप्पा ग्राउंड असा असणार आहे.
तरी सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती.

जनसंपर्क अधिकारी
मीरा-भाईंदर वसई-विरार
पोलीस आयुक्तालय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *