
केंद्रीय मंत्री स्मृति ईरानीच्या डहाणू येथील घरावर कांग्रेस चा मोर्चा।


डहाणू(प्रतिनिधि):- भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी अपशब्द वापरून त्यांचे अनादर केल्याचे आरोपावरुन पालघर जिल्हा कांग्रेस व जिल्हा महिला तर्फे डहाणू येथील श्रीमती स्मृति ईरानी यांच्या घरावर निषेध मोर्चा काढण्यात आले।या मोर्चाला पोलिसानी रास्त्यातच अडवून कांग्रेसजनाना ताब्यात घेतले। या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस अध्यक्षा संध्याताई सवालाखे, प्रदेश चिटणीस योगेश नम,पालघर जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा शरयू अवसरकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविश राऊत यांनी सम्बोधित केले. सदर मोर्च्यात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल चे चिटणीस लोकेश पाटिल,प्रदेश मीडिया सरचिटणीस सीमा पोद्दार वसई विरार महिला अध्यक्ष प्रविना चोधरी , चिटणीस रोशन पाटील, प्रदेश पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर वर्तक, पालघर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष रुफी भूरे, युवा काँग्रेस नेते कुलदीप वर्तक , मोईज शेख , मधुकर चौधरी व बळवन्त गावित, जिल्हा अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष आसिफ मेमन, अब्दुल खान , वकील संगठना अध्यक्ष एड.सुधीर जैन, पालघर जिल्हा कांग्रेस सरचिटणीस रामप्रकाश निराला, एड. मनोज दांडेकर व प्रकाश संखे , उज्ज्वला साळवे, प्रवीण चौधरी, उत्तर प्रदेश विधायक उम्मेदवार निर्मला भारती, पालघर शहर अध्यक्ष मनोहर दांडेकर, डहाणू तालुका अध्यक्ष सन्तोष मोरे, पालघर तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी, विक्रमगड तालुका अध्यक्ष घनश्याम आळशी, पालघर शहराध्यक्ष मनोहर दांडेकर , अदनान डांगे, सर्व तालुका अध्यक्ष,पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी,बहुसंख्यक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.