प्रतिनिधी : वसई पुरवठा विभागाचे रेशन खाजगी मिलमध्ये नेले जात असताना ट्रक पकडण्यात आला असून मिलला सील ठोकण्यात आले आहे. मात्र सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावरून रेशनचा काळाबाजार करणारे रेशनिंग धान्य माफिया व पुरवठा विभाग अधिकारी यांच्यातील साटेलोटे पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाकडून गोरगरिबांना दिले जाणारे धान्य शासकीय गोदामातून विजय सिंग नामक इसमाच्या खाजगी मिलमध्ये नेले जात असल्याची खबर पुरवठा विभागाला मिळाल्यानंतर पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी छापा मारून सदर ट्रक ताब्यात घेतला व मिलला सील ठोकले. मात्र सदर प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दि. ३/८/२०२२ रोजी पुरवठा विभागाने ही कारवाई केली. सदर प्रकरणात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल न झाल्यामुळे पुरवठा विभागाने नक्कीच सदर प्रकरणात सौदेबाजी केल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *