
तर पालिकेतील १४५ सार्वजनिक उद्यानांचा ठेका प्राधान्याने महिला बचत गटांच देण्यात द्या-महेश अंबाजी कदम भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष-विरार शहर मंडळ
वसई विरार शहर महानगर पालिका क्षेत्रात १४५ उद्यानांच्या देखभालीचा ठेका देण्याकरिता वृत्त पत्रात
स्वारस्य अभिरुची सूचना प्रसिद्ध करून इच्छुक नोंदणीकृत संस्था,मंडळे आणि बचत गटांनी अर्ज दाखल करावे अशी जाहिरात वृत्त पत्रात प्रसिद्ध करून अर्जाची अंतिम तारीख-२९/०७/२०२२ दिली होती,परंतु सदर प्रसिद्ध केलेली बातमी दोन दिवसापूर्वीच बचत गटातील महिलांना माहित झाली. कमी वेळेत अर्ज दाखल करण्याचे शक्य होत नसल्याने अनेक महिला बचत गटांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता येत नव्हते,त्यामुळे इच्छुकांन साठी अर्ज दाखल करण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवावी.अशी मागणी भारतीय जनता पार्टीनी केली आहे.
तर पालिकेतील १४५ सार्वजनिक उद्यानाची स्वच्छता,उद्यान गेट वेळेवर उघडणे बंद करणे, उद्यानामध्ये झाडलोट शोभिवंत रोपांची छाटणी/ पाणी,उद्यानामध्ये विद्युत दिवे सुरू बंद करणे, उद्यानामध्ये कारंजे असल्यास सुरू व बंद करणे, उद्यानातील खेळणी, जिम साहित्य व्यवस्थितरित्या हाताळली जात आहेत की नाही याकडे लक्ष ठेवणे, उद्यानाबाबत काही तक्रार/सूचना असल्यास संबंधित प्रभाग समितीत लेखी स्वरूपात कळविणे,तर उद्यानामध्ये कामे करण्याकरिता महापालिके कडून उद्यानासाठी पाण्याची व्यवस्था,उद्यानामध्ये वृक्ष लागवड,खत,लाल माती पुरवठा वगैरे,उद्यानामध्ये वीज व्यवस्था इत्यादी पुरविले जाणारे आहे,
तर अशा उद्यानाच्या देखरेखीसाठी अनुदान व त्याच उद्यानात व्यवसायासाठी स्टॉलसाठी परवानगी देण्यात येईल असे जाहीर सुचनेत पालिकेकडून नोंद करण्यात आलेली आहे, तर देखभालीच्या ठेका प्राधान्याने महिला बचत गटांनाच प्रस्थापित अटीत
१) ठेका देताना प्राधान्याने सदर महिला बचत गट कार्यरत आहे का ते पाहणे.
२)२०१६ ते आजतागायत प्रायोगिक तत्वावर व सतत मुदतीत वाढीचा ठराव मंजूर करून पूर्वलक्षी प्रभावाने ठेका दिलेल्या बचत गटांचा पुनर्विचार करण्यात येऊ नये.
३)एका महिला बचत गटांना एका पेक्षा जास्त उद्याने देण्यात येऊ नये,
४) पूर्वी ठेका होता आणि पुन्हा ठेका मिळावा म्हणून अर्ज केल्यास सदर अर्जाचा विचार करू नये.
५) पालिकेतील नोंदणीकृत बचत गट असंख्य असल्याने त्यांच्या वर नियंत्रण असावे म्हणून वस्ती स्तर संघ तर अनेक वस्ती स्तर संघ एकत्रित करून दोन शहर स्तर संघ स्थापित केलेले आहेत,त्यामध्ये प्रत्येक महिला बचत गट समाविष्ट केलेला असल्याने वस्ती स्तर संघाची शिफारस घेणे अनिवार्य करावे.
६) ठेका मंजूर केलेल्या महिला बचत गटांकडून सत्य पत्रात आम्ही आजतागायत पालिकेच्या कोणत्याही उपक्रमात लाभार्थी नसुन ह्या पूर्वी आमच्या कडे पालिका क्षेत्रातील कोणत्याही उद्यानांचा ठेका नव्हता असे सत्य प्रतिज्ञापत्र प्रत्येक ठेका मंजूर केलेल्या महिला बचत गटांकडून तयार करून घ्यावे.
७) तर उद्यानाचा ठेका मंजूर केलेला बचत गट उद्यानापासून लांब अंतरावर असल्यास पालिकेच्या परिवहन बसेस मधून मोफत प्रवास पास उद्यानाच्या कामकरिताच देण्यात यावा.
इत्यादी अटींचा समाविष्ठ करून घ्यावा,तसेच
वरील मुद्यांचा योग्य अशा विचार केल्यास नक्कीच योग्य गरजू महिलांना रोजगार मिळेल,असे मत महेश कदम यांनी मांडले आहे.
कारण सन-२०१६ ते २०१९ आणि २०१९ ते आजतागायत ह्या कालावधीत फक्त दोनदाच स्वारस्य अभिरुची सूचना प्रसिद्ध केल्याने इतर महिला बचत गटांनी सहभाग दर्शवला पण त्या इच्छुक महिला बचत गटांना डावलण्यात आले व फ़क्त एकाच पक्षाचा वरदहस्त असलेल्या मोजक्याच महिला बचत गटांना वारंवार त्यांच्या मुदतीत पूर्वलक्षी प्रभावाने सतत मुदतवाढीचे कार्यादेश कार्यालयातून काढण्यात आले.त्यावेळी कर्यालयातून नवीन इच्छुक बचत गट महिल्यानी अर्ज दाखल करून ही इतर इच्छुक महिला बचत गटांची फसवणूक करण्यात आली होती.
तसेच पालिकेच्या महिला बाळ कल्याण विभागात एकूण ९ प्रभाग पैकी ८ प्रभागात-३६३ बचत गटांची नोंदणी असून त्यातील काही गटात अध्यक्ष आहे तर सेक्रेटरी नाही,आणि सेक्रेटरी आहे तर खजिनदार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि या बाबत सदर माहिती ही माहिती अधिकाऱ्यात दिलेली आहे,
तर पालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कक्षात ऑनलाईन प्रणालीत एकूण-११५३ बचत गट आहेत, तर याच बचत गटांतील-११७३ गटांना एकत्रित करून ४०
वस्ती स्तर संघात समावेश करण्यात आलेला आहे, तर ह्याच वस्ती स्तर संघातून दोन शहर स्तर संघाची निर्मिती करण्यात आली आहे, परंतु ह्या सर्व बचत गटांच्या वापर कागदावरच आम्ही केले दाखवण्या पूरतेच मर्यादीत ठेवले, कारण एवढे जास्त प्रमाणत बचत गट असून सुद्धा २०१६ ते २०२२ पर्यंत फक्त-१२४ बचत गटांना ठेका देण्यात आला आहे ही महानगर पालिकेची शोकांतिका आहे,तर प्रभाग समिती-एच मध्ये एकाच बचत गटाला-६ काहींना-५,४,३,२ तर प्रभाग समिती ए मध्ये ४ बचत गटांना प्रत्येकी २-२ उद्याने दिली असल्याचे माहितीत उघड झालेले आहे, ही मक्तेदारी मोडीस काढून इतर गरजू महिलांना प्राधान्य देऊन त्यांना ठेका देण्यात यावा अशी मागणी-महेश अंबाजी कदम यांनी पालिकेच्या आयुक्तना केलेली आहे..