डॉ. संदेश वाघ सद्य परिस्थिती मुंबई विद्यापीठ येथे इतिहास विभाग मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरतआहे .त्यांनी इतिहास विभाग प्रमुख पद हीभूषविले आहे .मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषद तसेच फॅकल्टी चे ते सदस्य आहेत. एस एन डी टी विद्यापीठाच्या फॅकल्टी वर ते सदस्य आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पाली आणि बुद्धिस्ट स्टडी अभ्यास मंडळाचे सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या आंबेडकर थॉट अभ्यास मंडळा वर ते सदस्य आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सलंग्नित प्रताप महाविद्यालय येथे ते इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळावर ते सदस्य आहेत. जय हिंद महाविद्यालयाच्या पायाभूत अभ्यासक्रम अभ्यास मंडळावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यानी विविध अभ्यास मंडळावर कार्य करत असताना नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आणि ते लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यानी केंद्र तथा राज्य सरकार मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती याच्यावरील अत्याचार यांचा अभ्यास या संबंधातील त्यांचा हजारो पानाचा संशोधन प्रकल्प त्यांनी केंद्र सरकारला सादर केला आहे तसेच महाराष्ट्र शासनाला त्यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लोकांच्या करीता संरक्षना बाबत उपयुक्त सूचना केल्या आहेत . राज्यात नोडल ऑफिसर ची नियुक्ती, अनुसूचित जाती व जमाती करता विशिष्ठ विशेष न्यायालय तथा विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्ती अश्या अनेक बाबी संदर्भात त्यांनी सरकार कडे पत्र व्यवहार केला आहे. त्यामूळे महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता त्या कारकीर्दीत त्यांनी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आयोगच्या वतीने प्रस्ताव सादर केला तसेच आयोगाचे संकेत स्थळावर पीडितांना तक्रार नोंदवता यावी या करता महाराष्ट्र शासन ना कडून परवानगी मिळवली यात फक्त शासनाकडून संकेत स्थळ बनवण्या करता संबधिताची नियुक्ती करणे बाकी आहे. पायल तडवी आणि अनेक अत्याचाराच्या प्रकरणात त्यांनी अन्वेषण केले आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जाती या करता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम मधील तरतुदी प्रमाणे अकस्मिता योजना वर त्यांनी शासनाच्या समिती वर सदस्य म्हणून कार्य केले आहे व संबधित प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे सद्या प्रस्ताव लॉ अंड जुडीशियरी विभागाकडे अनेक वर्षापासून अंतिम माण्यते करता प्रलंबित आहे. हा प्रस्ताव जर पारित झाला तर अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील पीडितांना तत्काळ आर्थिक मदत, अत्याचारात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबाच्या आश्रित सदस्यांना शासकीय नोकरी,पेन्शन, सरकारी जागा, जाळपोळ ग्रस्त पीडितांना घर हे या योजने अंतर्गत निर्देशित केलेल्या कालखंडात तत्काळ प्राप्त होईल अश्या अनेक बाबीची तरतूद आणि त्या संबधित शासकीय विभाग यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत याला शासना कडून या अकास्मिकाता योजनेची अंमलबजावणी तत्काळ होणे ही पीडितांना न्याय मिळण्या साठी काळाची गरज आहे
महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे महात्मा फुले लेखन प्रकाशन समिती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती ह्या काही महत्त्वाच्या समित्या होत. पश्चिम भारताच्या इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरीकल रिसर्च या मानव संसाधन विभागाचे समन्वयक म्हणून त्यांनी कार्य केले आहे.त्यांचे अनेक संदर्भ ग्रंथ,शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यानी लिहिलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बूकलेट महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाने जपानी भाषेत प्रकाशित करून जपान येथील कोयासान विद्यापीठ येथे वितरित केले आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून 25 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत महाराष्ट्र शासनाचा आदर्श राष्ट्रीय स्वयंसेवक राज्य स्तरीय पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीचडी सर्वोत्कृष्ट पीचडी प्रबंध करिताचे इतिहासकार बि सी बेंद्रे पुरस्कार हे त्यातील महत्वपूर्ण पुरस्कार होत. सातत्याने त्यांना तीन वर्ष महाराष्ट्र शासनाची ओपन मेरिट स्कॉलरशिप कला शाखेच्या वर्गात प्रथम आल्यामुळे प्राप्त झाली आहे . पुढील अनेक देशात आंतरराष्ट्रीय परिषदा तसेच अभ्यास दौऱ्यात त्यानी सहभाग घेतला आहे पॅरिस,जर्मनी,इटली, डेन्मार्क, स्वीटझरलांड,जपान,श्रीलंका,थायलंड,नेपाल, इंडोनेशिया, दुबई,मलेशिया, सिंगापुर,मॉरिशस आदी देशात त्यांनी भेटी दिल्या आहेत. सध्या ते भारतातील बुद्ध धम्मा संबधित स्थळ यांची शासकीय माहिती जमा करणे आणि स्थळांना जोडणारा रस्ता तयार करण्या संदर्भात प्रक्लपावर ते कार्य करत आहेत. नालंदा विद्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय व महाविद्यालय या त्यांच्या शैक्षणिक संस्थाच्या वर ते पदाधिकारी आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप , विद्यार्थ्यांकरता शासकीय शिष्यवृत्त्या, मध्यान्ह भोजन आदी योजना त्यांच्या शैक्षणिक संस्थेत कार्यान्वीत आहेत. बहुजन चळवळीचे खंदे कार्यकर्ते ॲड एम ए वाघ यांचे चिरंजीव तसेच प्राध्यापक विलास वाघ सुगावा प्रकाशन यांचे पुतणे प्राध्यापक संदेश वाघ यांना वाढदिवसाच्या 7 ऑगस्ट रोजी मंगलमय शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *