

आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन द्वारा बुद्ध लेणी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर लगत,औरंगाबाद येथे दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकरी चळवळीत युवकांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते तसेच या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून पीचडी प्राप्त करणाऱ्या अनेक संशोधक विद्यार्थ्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधक राज्यस्तरीय पुरस्कार 2022 देण्यात आला. या प्रसंगी वर्षावासानिम्मित अन्नधान्य डॉ संदेश वाघ यांनी भिक्खु संघास दिले . या प्रसंगी लेणी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, छावणी शहर पोलिस स्टेशन यांनी संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा उपयोग समाजासाठी करावा व शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी प्रतिपादन. केले. त्यांच्या व डॉ वाघ यांच्या हस्ते विविध विद्यार्थ्याना या प्रसंगी पुरस्कार देण्यात आले. डॉ संदेश वाघ अध्यक्ष आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन यांनी संघटनेची भूमिका मांडताना सांगितले की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारत निर्माण करणे ही काळाची गरज आहे. संशोधकानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पे बॅक टू सोसायटी मिशन हा संदेश अनुसरवा.डॉ किरण काळे अध्यक्ष बामु विद्यार्थी युनिट यांनी संशोधक विद्यार्थ्याना काही त्रास झाला तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत तत्पर असेल असे सांगितले. डॉ कोंडीबा हटकर आणि डॉ विकास गवई यांनी सर्वांचे आभार मानले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.