
“माझ्या टेबलवर फाईल जमा नाहीत याचा अर्थ माझं काम परफेक्ट आहे. खुनशी व चिल्लर पत्रकार तक्रार करतात मला फरक पडत नाही.” तहसीलदार उज्वला भगत.
|वसई तहसिलचा कारभार गोलमाल ?
अधिकारी वर्गाची भारी मर्जी !
भले असो जेम्स कोतवाल फर्जी !
|२० वर्षांपासून प्रख्यात जेम्स अलमेडा कोतवाल !
तहसील मस्टरला एन्ट्रीच नसल्याने उठले सवाल!
|वसईतील प्रख्यात जेम्स अलमेडा तलाठी सजा गास गांवचे कोतवाल नक्की आहेत का?
|जन माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार तो शासकीय कर्मचारीच नाही.
|तक्रार होऊन दोन महिने उजाडले तरी जेम्स मोकाट.
|मंडळ अधिकारी होगाडे जेम्स अलमेडा यांना पाठिशी घालत आहेत. सस्पेन्डेड व्यक्ती सरकारी दस्तऐवज हाताळतात कसे?
वसई:(विनायक खर्डे) वसई तहसील कार्यालय हे या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. कधी अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात सापडतात तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ईतर व्यक्ती कारभार पाहतांना दिसतात. यांवर पत्रकार आवाज उठवला तर खंडणीच्या खोट्या केसेस मध्ये गोवले जाते. त्यामुळे फारस कोणी याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नाही.
याची परिचिती गेल्या दोन महिन्यांपासून सिराज मलिक यांनी जेम्स अलमेडा या फर्जी कोतवालाबाबत पाठपुरावा करताना आली.
१७ जून २०२२ ला स्पिड पोस्टाद्वारे वसई तहसील मध्ये माहिती अधिकार आवक-जावक कर्मचाऱ्याने रजिस्टर मध्ये इनवर्ड न करता लपवून ठेवला महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यावेळेस तेथे एक वेगळाच प्रकार दिसला. आवक जावंक कर्मचारी हा दिव्यांग व्यक्ती असून त्याची प्रकृती ठिक नसल्याने एक त्रयस्थ तरुण त्याचं काम करतोय. त्याची चौकशी केली असता तो ना सरकारी ना ठेका कर्मचारी आहे. सरकारी दस्तऐवज हाताळण्याची कोणताही अधिकार नसतांना आवक जावक कर्मचाऱ्याला कोणी अधिकार दिलेत?
जेम्स अलमेडा हि व्यक्ती गेली २० वर्षांहून अधिक काळ गास तलाठी कार्यलयात कोतवाल असल्याचे सर्व ग्रामस्थ तसेच संपूर्ण वसई तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. या बाबत गास, निर्मळ तसेच ईतर मंडळ अधिकारी, तलाठी यांना विचारले असता तो कोतवाल पदावर कार्यरत आहे. एव्हाना त्याच कार्यलयात बसणारे मंडळ अधिकारी होगाडे यांनीहि या गोष्टींला दुजोरा देत तो सस्पेन्डेड आहे व कार्यरत आहे. तेथील कार्यलयात ती व्यक्ती कोतवाल पदावर आहे हेच समजून दैनंदिन व्यवहार करत आहेत.
पण जेंव्हा माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत खरा प्रकार उघडकीस आला असून आशा नावाचा कोणताही व्यक्ती हा वसई तहसीलमध्ये शासकीय कर्मचारीच नाही. तरीसुद्धा तहसीलदार मॅडम उज्ज्वला भगत यांनी पुन्हा चौकशी करून माहिती देणास बजावले. पण आजतागायत कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. मंडळ अधिकारी होगाडे कडे करण्यात आलेल्या प्रथम अपिलाचे उत्तर मिळालेले नाही कारण मंडळ अधिकाऱ्यांच्या मते जेम्स अलमेडा हा सस्पेन्डेड कोतवाल आहे. पण कोणत्याही कोतवाल पदावरून सस्पेन्डेड व्यक्तीला कामवर पुन्हा रुजू केले जात नाही. मग असा फर्जी कोतवाल ईतके वर्षे काम का करत आहे? यांच्यामागे असे कोण पाठबळ आहे? कोण अधिकारी पाठीशी घालत आहेत? विशेषतः मंडळ अधिकारी होगाडे अशा कर्मचाऱ्यांना कार्यलयात ठेवून का घेतात? यांचे काय लागेबांधे आहेत. काही दिवसांपूर्वी नायब तहसिलदार यांना २ लाखाच्या लाचलुचपत कारवाई मध्ये अटक झाली. मग अलमेडा यांनी ईतक्या वर्षात कीती माया गोळा केली यांची चौकशी होणे गरजेचे आहे? अशा दलालांनी सर्वसामान्य जनतेला फसवून स्वतः चे व अधिकाऱ्याचे खिशे भरले आहेत. पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकांची दिशाभूल करणाऱ्या जेम्सवर कलम ४२०, १७० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना चिटणीस सिराज मलिक यांनी केली आहे.