रुग्णमित्र संस्था भेट उपक्रम अंतर्गत आज जीवनदायी भवन येथे रुग्ण मित्रांची आढावा बैठक डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी तसेच या मध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आजची बैठक रुग्णमित्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती.
डॉ सुधाकर शिंदे यांनी योजनेची व्यापकता व योजना कशा प्रकारे गरजू रुग्णांना दिलासा देते याची माहिती दिली. योजनेच्या व्यतिरिक्त काही रुग्णालये वरून काही रकमेची मागणी करतात याबाबत डॉ सुधाकर शिंदे यांनी रुग्णांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. २५% खाटा या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राखीव असतात तसेच या योजनेबद्दल जनजागृती होणे आवश्यक असणे गरजेचे आहे. आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी खुबे - सांधे - गुडघे बदल शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया या योजनेत खासगी रुग्णालयात देखील व्हाव्या अशी मागणी केली असता डॉ शिंदे यांनी सदर या शस्त्रक्रिया सरकारी - खासगी वैद्यकीय महाविद्यालय तसेच सरकारी रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती दिली. राजेंद्र ढगे यांनी वसई विरार मनपा क्षेत्रातील सरकारी रुग्णालयात योजनांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. महात्मा फुले जन आरोग्य योजना व वि मनपा क्षेत्रात सुरू करण्याची मागणी संस्कार सेवा संस्था च्या पिंकी पाटील यांनी केली.
तत्पूर्वी जमलेल्या सर्व रुग्ण मित्रांनी आप आपला परिचय करुन एकमेकांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला, प्रसन्न फाउंडेशन च्या श्रद्धा अश्टीवकर यांनी त्यांच्या संस्थेने केलेल्या उपक्रमाची माहिती पुस्तिकाचे उद्घाटन डॉ सुधाकर शिंदे यांच्या हस्ते केल. धनाजी पवार, विनोद साडविलकर यांनी रुग्णमित्रांच्या वतीने डॉ सुधाकर शिंदे यांचे आभार मानले. साधारणतः रुग्ण साठी मदत करणाऱ्या २५ हून अधिक संस्थांनी या बैठकीत सहभाग घेतला होता, भविष्यात या संस्था महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा तळागाळात प्रचार, प्रसार व योजनेतील अपप्रवृत्ती ला आळा बसवण्याचे कार्य करतील अशी ग्वाही डॉ सुधाकर शिंदे यांना दिली व यासाठी लागणारी शक्य ती मदत जीवनदायी भवन मधून रुग्णमित्रांना केली जाईल असे आश्वासन देऊन या बैठकीची सांगता झाली.