
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बोगनवेल रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात सभोवताली सुशोभीकरणाच्या निमित्ताने ही रोपे लावण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष, वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांच्या समवेत अति.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कृषी व वित्त समिती सभापती शीतल गुरोडा , जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा,काशिनाथ चौधरी,अरुण ठाकरे, भक्ती वलटे, मिताली बागुल, कुसुम झोले, प्रकल्प संचालक तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) संघरत्ना खिल्लारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार,जिल्हा कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांनी रोपांची लागवड केली.
कृषी विभागाचा हा स्तुत्य उपक्रम असून जिल्हा परिषदेच्या आवाराची शोभा यामुळे वाढेल असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.