
पारोळ
स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव वसई विरार महानगर पत्रकार संघाच्या पत्रकारांनी वसई तालुक्याचा दुर्गम आदिवासी भाग असलेल्या खैरपाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला .भारताच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून या शाळेतील सुमारे ७५ विध्यार्थ्यांना कंपासबॉक्स , वह्या,पेन,पेन्सिल आणि रंगबॉक्स आदी शैक्षणिक साहित्यासह मिठाई,बिस्किटे आदींची भेट देण्यात आली यावेळी मांडवी पोलीस दलातील सहाय्यक पो उप निरीक्षक किशोर तांबोरे , अंमलदार संदीप मोकळं , तसेच पो कर्मचारी गजानन देसले ,नितीन गलांड, सुदेश कोरे ,व वि म पत्रकार संघाचे खजिनदार विजय खेतले , सेवा सोसायटी चे अध्यक्ष रमेश घरत , शिवसेनेचे भगवान वझे , अशोक पाटील , सामाजिक कार्यकर्ते बारक्या पाटील , काँग्रेसचे हर्षद खंडागळे , सरपंच प्रमिला दुमाडा , पोलीस पाटील रामदास बुरुड , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा भगत , ग्रा पं सदस्य अंकिता चिंबडा ,प्रमुख शिक्षक गणेश जाधव , सह शिक्षक मनोज मढवी ,अंगणवाडी कार्यकर्ती विमल पडवळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विध्यार्थी उपस्थित होते .
वसई तालुक्याचा दुर्गम सीमा भाग असलेल्या तिल्हेर ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील खैरपाडा व या परिसरातील अनेक पाडे व वस्त्यांमधील १०० टक्के आदिवासी विध्यार्थी खैरपाडा या पाचवी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत धडे गिरवतात . जवळपास १०० टक्के आदिवासी असलेला हा भाग दुर्गम समजला जात असून असल्याने या भागातील मुलाना शिक्षणासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने त्याच्या शिक्षणात हातभार लागावा या साठी वसई विरार महानगर पत्रकार संघाने शैक्षणिक साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे. या साठी मांडवी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, नवनीत पब्लिकेशन्स चे महेश गुजर, व्यवसायिक विक्रम शितोळे, अनिता गॅस चे लाल ठाकुर, किरण पाटील, नंदनवन रिसॉर्ट चे किरण तरे व राजेश किनी यांनी हातभार लावला तर पत्रकार सुनिल घरत, विश्वनाथ कूडु, महेश पाटील, हरीचंद्र गायकवाड, लक्ष्मीप्रसाद पाटील, ईश्वर भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.