
🔸वसईत स्व रचित काव्य वाचन स्पर्धेतील भावना
वसई ( प्रतिनिधी) रविवारी वसईत आभाळमाया साहित्य, शिक्षण, कला, नाट्य विकास मंडळाने राज्य स्तरीय स्व रचित कविता वाचन स्पर्धा आयोजित केली होती. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी कविता करणे खरच सोप्प नसत त्यासाठी उपजत गुण असावे लागतात अशा भावना व्यक्त केल्या. रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता वसई रोड येथील पी. पी. पैरेडाइज हॉल येथे या मंडळाने स्व रचित कविता वाचन स्पर्धा आयोजित केली होती. या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, सेंट गोंसालो गार्सिया कॉलेज चे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते आणि सी ए आणि प्रख्यात कवी अनादि भसे हे प्रमुख पाहुणे होते त्यांच्या सोबत मीडिया पार्टनर म्हणून अनिता घायवट, प्रमोद गायकवाड हे उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून प्रख्यात कवी, समीक्षक, लेखक उत्तम भगत, गझलकार सुनील ओव्हाळ, आणि सुप्रसिद्ध कवयीत्री शिल्पा परुळेकर उपस्थित होत्या. यावेळी विविध तालुका जिल्ह्यातून ५० कवींनी सहभाग घेतला. प्रत्येक कविता दमदार होती. या स्पर्धेत प्रथम कविता मधुमती कुलकर्णी यांना मिळाला, दुसरा क्रमांक मधुकर. इरकर, तिसरा क्रमांक पाटील आणि उत्तेजनार्थ महेंद्र पाटील यांना मिळाला त्या सर्वांना रक्कम, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद उबाळे सर, प्रमुख अतिथी डॉ. विभेतेसर आणि कवी अनादि भसे यांनी समय सूचकता दाखवून आपले भाष्य केले. कवितेचे महत्व विशद करून कवतेचे सादरीकरण करून उत्तम मार्गदर्शन केले. श्री. भसे यांनी विनोदी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे अंतिम टप्यात परीक्षकांनी आपल्या मनोगतातून नवोदित कवींना मार्गदर्शन करून आपल्या कविता सादर केल्या मंत्रमुग्ध अशा कविता एकूण श्रोते भारावून गेले होते या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरूण घायवट आणि खजिनदार संध्या गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चरण घायवट, नियमांचे वाचन स्वप्नाली गायकवाड तर आभार प्रदर्शन चित्रा घायवट ह्यांनी केले.