

विरार प्रतिनिधी : दि. १६ आँगस्ट २०२२ रोजी विरार पूर्व पाटील कंपाऊंड, रिद्धी-सिध्दी इंडस्ट्रीज च्या समोर, चंदनसार येथे आगरी सेने मार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्याच प्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. नवनिर्वाचित नेमणूक झालेल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच सदस्यांनी आपल्या जिल्ह्यात कशा प्रकारे काम केले पाहिजे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्यांनी कार्यकर्ते व सदस्य यांना मार्गदर्शन केले. पालघर जिल्हा व अनेक जिल्ह्यात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगरी सेना तत्पर असतेच आजच्या डिजिटल युगात वावरताना आगरी सेनेनी वर्धापन दिनी वेबसाईटवर सुरू केलीच पण आता मोबाईल अँप सुध्दा सुरू केले आहे तरी अँप द्वारे आँनलाईन तक्रारी, आँनलाईन रजिस्ट्रेशन फोम भरणा समस्या व तक्रारीसाठी सदर अँपचा वापर होणार आहे त्याच प्रमाणे पाच जिल्ह्यात कशा प्रकारे काम व माहिती अँप मध्ये आपणास प्राप्त होणार आहे. कार्यक्रमात युवकांच्या विषयी बोलताना सांगितले की युवकांची मोठी समस्या हि रोजगार आहे तरी आगरी सेना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे. नाशिक मध्ये आगरी सेनेचे झपाट्याने काम सुरू असताना निवडणूक काळात आगरी सेना ही राजकारणावर वर्चस्व ठेऊन असते. येणाऱ्या काळात दाखवून देऊ की आमचे सभासद किती व पाठबल किती हे दाखवू. पालघर जिल्ह्यात निवडणूका होतच असतात पण आगरी सेना हि तळागाळापर्यंत पोहचणारी संघटना आहे. पालघर जिल्ह्यात एक लाख सदस्य नोदणी अभियान सुरू करणार आहोत व येत्या सहा महिण्यात पुर्ण करण्याचे मानस आहे. पालघर जिल्ह्यातील पंचम कोळंबी प्रकल्पा बाबत महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांनी असे सांगितले कि पालघर टेम्भेखोडावे, जलसार, विराथन, वेढी, डोंगरे, खार्डी परिसराच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत २००० ते ३००० एकर खाजण जागा भाडेतत्त्वावर घेऊन ३० वर्षे काही उपऱ्या लोकांनी भुमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचे साधन हीरकावुन घेतले आहे. १९९१ साली हया जागा सरकारने पंचम कोळंबी प्रकल्प नावाच्या एका कंपनीला खिरापती सारख्या वाटल्या स्थानिक तत्कालीन नेत्यांना हाताशी धरून ग्रामस्थांचा विरोध असताना सदर कोळंबी प्रकल्पाची मुदत आँगस्ट २०२१ वर्षात संपली आहे. राजकीय पाठबल असल्याने पुन्हा ३० वर्षासाठी सरकारी खाजण जागा भाड्याने मिळवण्यासाठी सदर कंपनी प्रयत्न करत आहे. शासनाने जागा भाडेतत्त्वावर देताना घातलेल्या कुठल्याही नियम व अटीची पुर्तता पंचम कोळंबी प्रकल्पाने केली नाही. हया खाजण जागा वंशपरंपरागत येथील भुमीपुत्रांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने त्या जागा स्थानिक गावातील महिला बचत गटांना मत्स्यशेतीसाठी मिळाव्यात अशी मागणी स्थानिक महिला बचत गटांमार्फत मा. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, बंदर विकास मंत्री, पालक मंत्री, जिल्हाधिकारी अशा विविध स्तरावर केली गेली आहे व त्याचा पाठपुरावा आगरी सेना वेळोवेळी करत आहे. जर का न्याय नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिला आहे.