
वसई – ( प्रतिनिधी ) – वसई काँग्रेसतर्फे राज्याच्या माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक उर्फ माईसाहेब यांच्या ९६ जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे काँग्रेस तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रथम माईसाहेबांच्या तसबिरीला वसई विरार शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक व महिला अध्यक्ष प्रवीना चौधरी यांनी पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर माजी मंत्री अण्णासाहेब वर्तक पद्मश्री भाऊसाहेब वर्तक ,वसई शहर अध्यक्ष स्वर्गीय मायकल फुट्याडो यांच्या तसबिरीना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी स्वर्गीय माईसाहेब यांचा जीवनपट उलगडताना मोहन घरत म्हणाले बोर्डी येथील थोर स्वातंत्र्य सैनिक निष्ठावंत गांधीवादी व धेय्यवादी शिक्षक आत्मरामपंत सावे यांची कन्या असलेल्या तारामाई यांचा जन्म
21 ऑगस्ट 1926 सालि बोर्डी येथे झाला. त्यांच्या संवेदनाक्षम मनावर गांधीवादी विचारांचे व ध्येयवादी वृत्तीचे संस्कार झाले. 1944 सालि थोर नेते अण्णासाहेब वर्तक यांचे सुपुत्र नरसिंह तथा भाईसाहेब वर्तक यांच्याशी त्यांच्या विवाह झाला. अण्णासाहेब व त्यानंतर भाऊसाहेब यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या जीवनकार्याची दिशा निश्चित केली. 1962 साली विरारच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेऊन त्यांनी आपल्या क्रियाशील राजकीय जीवनाचा शुभारंभ केला. 1972 साली त्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. व १९८० साली त्यांची राज्य विधानसभेवर निवड झाली त्याचवेळी त्यांची राज्यमंत्रीपदावर ही नेमणूक होऊन त्यांनी बांधकाम परिवहन समाज कल्याण या खात्याची प्रशासन कौशल्याने धुरा सांभाळली. 1984 साली विद्यावर्धिनी तर्फे तंत्रनिकेतन व अभियंत्त्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यामुळे वसई तालुक्यात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार झाला. या आदरांजली कार्यक्रम प्रसंगी वसई शहर ब्लॉक अध्यक्ष बिना फुट्याडो , कुलदीप वर्तक , प्राणिना चोधरी , नवघर माणिकपूर ब्लॉक सरचिटणीस विल्फ्रेड डिसोजा , आनंद चव्हाण , शाहिद शेख , किरण शिंदे उपस्थित होते.