
, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री अनिल पवार यांची भेट घेऊन “आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या नाहीतर स्थगित “आमरण उपोषण” पुन्हा महानगरपालिकेच्या मुख्यालयातच चालू करण्यात येईल हा इशारा दिला. वसईतील 69 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही योजना डिसेंबर 2008 रोजी मंजूर होवून तत्कालीन जलसंपदा मंत्री श्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य यांच्याहस्ते फेब्रुवारी 2009 रोजी सुमारे 85 कोटी रुपयांची वसई तालुक्यातील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर 3 जुलै 2009 रोजी वसई विरार शहर महानगरपालीकेची स्थापना झाली. त्यामुळे या योजनेतील 69 गावांपैकी 52 गावांचा समावेश महानगरपालीकेत झालेला आहे. “महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या” माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार होती परंतु महानगरपालिमेच्या माध्यमातून सामायिकपणे योजनेचे काम चालू होते.
सुरवातीला या योजनेद्वारे 69 पाण्याचे जलकुंभ उभे करण्यात आले आणि गावागावात पाईपलाईन टाकण्यात आली. ही योजना पूर्ण करण्यास सातत्याने विलंब झाल्याने योजना पूर्णत्वाची तारीख सातत्याने बदलुन दिनांक 31 मार्च 2019 रोजी योजना पूर्ण करण्याची तारीख अंतिम करण्यात आली. त्यातच अगोदरची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याने वसई विरार महानगरपालीकेने नव्याने सुमारे 12 कोटी खर्च करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम ऑक्टोबर 2019 रोजी चालु केले. परंतु आलापर्यंत एकून 85 + 12 असे 97 कोटी खर्च करूनही मागील 13 वर्षापासून योजना पूर्णच होत नाही तसेच पाईपलाईनही टाकण्याचे कामही अर्थवट झालेले आहे.
आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 2006 पासून सातत्याने पाठपूरावा करीत असून वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आलेली आहेत. श्री समीर सुभाष वर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मॅकेन्झी डाबरे यांनी दिनांक 20/12/2020 ते 22/12/2020 रोजी या योजनेतील वाघोली गावातील पाण्याच्या टाकीच्या खाली “आमरण उपोषणास” केले होते. त्यावेळी महानगरपालीकेतर्फे जुन 2021 पर्यंत ही योजना पूर्व होवून सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. जे आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. तसेच दिनांक 07/02/2020 रोजी झालेल्या मा. जिल्हाधिकारी , पालघर यांच्याकडे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 69 पैकी 52 गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे वसई विरार शहर महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे मा. जिल्हाधिकारी, पालघर यांनी स्पष्ट केलेले आहे.
परंतू असे असतानाही दिनांक- 25/7/ 2022 रोजी श्री समीर वर्तक यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत माननीय आयुक्तांनी महानगरपालीकेची जबाबदारी अमान्य करतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ” पाणीपुरवण्याची जबाबदारी ढकललेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महानगरपालीका क्षेत्रातील प्रत्येक नागरीकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळालेच पाहीजे हे स्पष्टपणे अधोरेखित केलेले असतांनाही महानगरपालिका ही जबाबदारी झटकू पाहत आहेत. तसेच महानगरपालीका क्षेत्रातील 52 गावे आणि उर्वरित 17 गावे ज्यांचे “नियोजन प्राधिकरण” महानगरपालीके कडेच आहे म्हणून सर्व 69 गावांना पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेचीच आहे.
त्याचप्रमाणे सातत्याने महानगरपालीकेकडून वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसारित होत आहेत की डिसेंबर 2022 पर्यंत “मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ( MMRDA )” माध्यमातून 185 MLD पाणी वसई – विरारसाठी मिळणार आहे . परंतु मिळालेल्या माहितीनुसार यातील पाणी वसईतील 69 गावातील गावक – यांना मिळणारच नाही. म्हणजेच वसईतील 69 गावातील भूमिपुत्र नागरीक पिण्याच्या पाण्यापासून वंचितच राहणार आहोत आणि वसईतील भूमीपूत्रांची तहान महानगरपालीकेतर्फे भागविली जाणारच नाही. त्यातच शासनाची कोणतीही पाणीपुरवठयाची व्यवस्था नसल्याने 69 गावातील नागरिक जे जमिनीतील पाणी पिण्यासाठी वापरतात त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्या पाण्यात क्षारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरीकांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे.
म्हणूनच श्री समीर वर्तक यांनी मा. आयुक्तांना विनंती केली आहे की वसईतील 69 गावांना त्वरीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दयावे अन्यथा दिनांक 22/12/2020 रोजी महानगरपालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केलेले “आमरण उपोषणाचे” आंदोलन लवकरच महानगरपालीकेच्या मुख्यालयातील मा. आयुक्तांच्या दालनातच सुरू करण्यात येईल. आणि जर यामुळे “कायदा व सुव्यवस्थेचा” प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालीकेच्या आयुक्तांची राहील असा इशारा श्री समीर वर्तक यांनी दिला. यावेळी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री अम्मार पटेल, वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फुरटॅडो, सेवादल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री आलम अन्सारी, सामाजिक कार्यकर्ते श्री दर्शन राऊत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.