
वसई (प्रतिनिधी) – वसई पूर्व येथील एव्हरशाईन सिटी परिसरात विद्या विकासनी शाळेच्या मागे असलेल्या गोखीवरे हद्दीत सर्वे न.113/1 या जमिनीमध्ये अनधिकृत चाळीचे बांधकाम करुन ते विकून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहेत, वसई विरार महानगरपालिकेच्या विकास आराखाड्यात सदर जागेवरून रस्ता दाखविण्यात आलेला आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी बाधित असलेल्या क्षेत्रावर काम करू न देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे.तसेच अनधिकृत बांधकाम निष्काशीत करने कामी राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रक निगर्मीत करुन अनधिकृत अतिक्रमणावर कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिकाने दिलेले आहेत.परंतु काही भुमाफिया मंडळी आर्थिक स्वार्थापोटी सदर जागेमध्ये बेकायदेशीर चाळीचे बांधकाम सुरु आहे .असे लेखी पत्र मनपा आयुक्त, प्रभाग समिती ड चे सह आयुक्त आणि वसई तहसीलदार यांना बहुजन महापार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष श्री. परेश घाटाळ यांनी दिले संबंधित विकासकावर आणि बांधकाम निष्काशीत न केल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असे आमच्या प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करताना सांगितले.
