
बेशिस्त आरोग्य निरीक्षक श्री. निलेश जाधव यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून हाकलपट्टीची मागणी-महेश अंबाजी कदम भाजपा-उपाध्यक्ष विरार शहर मंडळ
वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात श्री. निलेश जाधव हे ‘आरोग्य निरीक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापन हा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने नागरी समस्या, अडचणी आणि त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे सोडवणे, ही या विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची नैतिक जबाबदारी आहे. किंबहुना नागरिकांच्या, तक्रारी, समस्या,अडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधणे,तक्रार निवेदनास योग्य उत्तर देणे, नागरिकांना कार्यलयीन वेळेत भेटणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे.
पण आरोग्य निरीक्षक श्री. निलेश जाधव हे नेहमी मीटिंग आणि जेवायला घरी किंवा हॉटेलला जातात,वास्तविक कार्यलयीन जेवणाची वेळ निश्चित्त केलेली असते त्या वेळेत जेवून पुन्हा सेवेत हजर असणे गरजेचे असते पण त्यांना जेवण करायला ३ तास का लागतात? हा एक संशोधनाचा विषय आहे,असे महेश कदम यांनी म्हटले आहे.
आज शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक जागेत कचऱ्याचे थर रचलेले दिसतात एका बाजूला रोगराही होऊ नये म्हणून आरोग्य विभाग जनजागृती करताना दिसते तर दुसऱ्या बाजूला रोगांना आमंत्रित करण्याचे काम घनकचरा विभाग करताना दिसते.
मात्र प्रसार माध्यमाला स्वतःच्या नावाने आणि पदानी बातम्या देतात वास्तविक प्रसार माध्यमांशी बोलण्याचे काम संबंधित उपायुक्त अथवा सहाय्यक आयुक्तांचे असते पण ह्यांना डावलून स्वतः पुढे पुढे करण्यास निलेश जाधव चतुर आहेत.
तसेच म्हणजे घन कचरा संकलन करण्यासाठी परिवहन विभागातून ७६ कॉम्पॅक्टर व ७२ टिपर देण्यात आलेले आहेत.सदर वाहने ही वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मालकीची आहेत,परंतु यांची देखभाल कोणी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झालेल्या आहे कारण प्रति वर्षी करोड रुपयांची तरतूद दुरुस्ती आणि रंगरंगोटी साठी केली जाते मात्र प्रत्यक्षात वाहनाची अवस्था पाहिली तर ती वाहने भंगारातील आहे की काय असे वाटते, तर काही वाहने ही रस्त्यात बंद पडून उभी असतात. वाहनांच्या दुरुस्तीवरती खाजगी ठेकेदाराला करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा पालिकेने स्वतःचा युनिट उभारणे सद्यस्थितीत गरजेचे आहे .परंतु हे करण्यास परिवहन विभाग पुढाकार घेणार नाही असे केल्यास नक्कीच यांच्या चिरीमिरीला आला बसेल अनेक वर्षे खुर्चीला चिटकून बसलेले कर्मचारी पळवाट काढतील यात तिळमात्र शंका नसणार.
वरती नमूद केलेल्याप्रमाणे परिवहन विभागातून ७६ कॉम्पॅक्टर व ७२ टिपर हे घनकचरा विभागाला देण्यात आलेले आहेत.तर ७६ कॉम्पॅक्टर हे आरटीओ कार्यालयातून प्रथम नोंदणी केल्यावरती जे योग्यतेप्रमाण पत्र जारी केले तेव्हढेच पुन्हा ते वाहन आरटीओ कार्यालयात पासिंग करिता दाखल करून घेणे मोटार वाहन कायदाने बंधनकारक असतानाही बिना पासिंगची सदर वाहने गेली १० ते ८ वर्ष शहरात घनकचऱ्याची वाहतुक करत आहेत, तर ७२ टिपरपैकी नव्याने १७ खरेदी केलेल्या टिपरची कागद पत्र वैधता दिसून येत आहे मात्र ५५ टिपरची अवस्था कॉम्पॅक्टर प्रमाणेच आहे, त्यामुळे कागदपत्र्यांची वैधता संपुष्ठात होण्या अगोदर घनकचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागद पत्र्याची वैधता करून घेण्याचे काम पालिकेच्या परिवहन विभागाचे असते पण परिवहन विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्मानीय विश्वनाथ तळेकर साहेब ही जबाबदारी माझी नसून घनकचरा विभागाची आहे कारण आम्ही त्यांच्या ताब्यात वाहने दिलेली आहेत,याबाबतचा पत्र व्यवहार संबधित घन कचरा विभागाशी आम्ही केला आहे असे सांगतात पण प्रत्यक्षात केलेल्या पत्र व्यवहाराच्या प्रति मागितल्यावर देतो देतो करून टाळतात का? तर तळेकर म्हणतात की वाहनांची पियुषी,विमा प्रमाणपत्र काढण्याचे काम माझ्या विभागाचे आहे मात्र सदर वाहनाची पासिंग करण्याचे काम घनकचरा विभागाचे असल्याने ते त्यांनी करणे गरजेचे सांगून स्वतःला त्या जबाबदारीतून मुक्त करून घेतात.
तर पालिकेच्या परिवहन आणि घन कचरा विभागाची नामुष्की म्हणजे यातील काही वाहनांची कागदपत्रेच सापडत नाही म्हणून सांगतात वास्तविकता नव्याने कागद पत्र बनवण्याची पद्धत सोपी असतानाही कागद पत्र बनवले जात का नाहीत तर कागदपत्रे हरवलेल्या वाहनांचे नोंदणी क्रमांक आणि कागद हरवले म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनला केलेल्या पत्रांच्या प्रति दाखवत नाहीत.यावरूनच परिवहन विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागात मोठा भ्रष्टाचार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
वरील संपूर्ण परिस्थिला जबाबदार म्हणून परिवहन विभागाची सखोल चौकशी करणेकामी समिती स्थापित करावी म्हणून अनेकदा निवेदन दिली पण त्या निवेदनाला एक ही उत्तर आजता मितीस उपायुक्त-किशोर गवस साहेबांनी दिलेले नाही,यावरूनच यांच्या कार्य पद्धतीत किती पारदर्शता आहे याची जाणीव होते.
असो पण घन कचरा विभागात ही परिवहन विभागाचच भावंड असल्याचे स्पष्ट दिसत असून उपायुक्त-अजिंक्य बगाडे किती लक्ष घालून चौकशी करतात याकडे काही दिवस तरी पाहावे लागेल जर घनकचरा व्यवस्थापन विभाग निरीक्षक-निलेश जाधव आणि उपायुक्त-अजिंक्य बगाडे यांची भागीदारी असेल तर कारवाई निश्चित होणार नाही पण आयुक्त साहेब यांनी १५ दिवसात बेशिस्त घन कचरा व्यवस्थापण विभाग निरीक्षक-सन्मानीय निलेश जाधव यांची हकालपट्टी केली नाही तर आयुक्त्यांच्या दालनात भारतीय जनता पार्टी विरार शहर मंडळाकडून ठिय्या आंदोलन केले जाईल.असे निवेदन देण्यात आलेले आहे