

सहाय्यक प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर, सतीश मांडवेकर आणि कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद पालघर, शेखर वडारकर हे दिनांक ३०/८/२०२२ रोजी निवृत्त होत असून त्यांचा आनंदी निवृत्ती दिन आज साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, सिद्धाराम सालीमठ आणि उपाध्यक्ष तथा शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती, ज्ञानेश्वर सांबरे, यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, नवनिर्वाचित अति.मुख्य कार्यकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक तुषार माळी, कार्यकारी अभियंता बांधकाम नितीन भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तीच्या च दिवशी दोन्ही अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती चे सर्व लाभ देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.