
पालघर/बोईसर,दि.2 सप्टेंबर
अती संवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर येथील भाभा अणूऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्या सोबत बंदुक आणि तीस जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.तो कुठे गेला, त्याने ही काडतुसे का घेतली, तो कोणाला भेटला आणि तो सद्या कुठे आहे या प्रसाश्नांनी सर्व सुरक्षा यंत्रणा चक्रावली असून या जवानांचा युद्ध पातडीवर तपास सुरू आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पाच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प आहे.हा प्रकल्प अती संवेदनशील असल्याने या ठिकाणी केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो.
या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत असलेला केंद्रीय औद्योगिक दलाचा जवान स्वतःजवळ असलेली पिस्टल आणि 30 जिवंत काडतुसांसह काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक गायब झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे.मनोज यादव असे या गायब झालेल्या जवानाचे नाव असून तो सन 2010 पासून सेवेत असून दोन महिन्या पासून तो तारापूर येथील अणुशक्ती केंद्रात रुजू झाला होता. मूळचा चंदोली उत्तर प्रदेशाचा राहणारा असल्याचे समजते.तारापूर येथे असलेल्या सीआयएसएफ कॉलनीमध्ये एकटा राहणारा हा जवान काही तासानंतर पुन्हा कामावर रुजू होईल याच्या प्रतीक्षेत सीआयएसएफ चे स्थानिक अधिकारी व कर्मचारी होते मात्र सायंकाळ पर्यंत त्याचा ठाव ठिकाणा न लागल्याने तारापूर येथील पोलीस ठाण्यात सीआयएसएफ तर्फे माहिती देण्यात आली.
ही घटना देशाच्या सुरक्षेसंदर्भात अतिशय गंभीर असल्याने याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून जवानाला शोधण्यासाठी गुजरातला पोलिसांची टीम रवाना करून शोधमोहीम सुरू केली आहे.
चौकट :
हा जवान पिस्टल व 30 जिवंत काडतुसे घेऊन गेल्याने तो या कडतुसांचे काय करणार आहे.त्याचे लक्ष काय आहे याची शंका व्यक्त करण्यात येत असून सुरक्षा यंत्रणा प्रचंड टेन्शनमध्ये आली आहे. हा जवान अनुशक्ती केंद्रातील सुरक्षेच्या गोष्टी आहे त्याचा रहस्य भेद तर करणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.