
जिल्हयातील 64108 लाभार्थ्यांनी अद्याप e-KYC प्रक्रिया करणे बाकी
पालघर/प्रतिनिधी :.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्यांनी दि.२५ सप्टेबर २०२२ रोजी वितरीत होणारा १२ वा हप्ता मिळण्याकरीता, पात्र लाभार्थ्यांनी e-KYC दि. ७ सप्टेबर २०२२ पर्यंत पुर्ण करण्याबाबत शासनाने कळविले आहे. पालघर जिल्ह्यातील ६४१०८ लाभार्थ्यांनी e-kyc पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर लाभार्थ्यांनी दि. ७/९/२०२२ पर्यंत e-kyc पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्यासाठी e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC केली नाही, अशा लाभार्थ्यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे.
e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून, e-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी खालील दोन पध्दतीने e-KYC करता येईल.
लाभार्भी स्वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा PMKisan अँपद्वारे OTP द्वारे मोफत करता येईल. (पुढील लिंक व्दारे Direct e-KYC टॅब ओपन होईल – https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
ग्राहक सेवा केंद्र (CSC) येथे प्रति लाभार्थी रूपये १५/- दराने e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.
पालघर जिल्ह्यातील 64108 लाभार्थ्यांनी अद्याप e-KYC न केल्याने योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे. e-KYC न केलेल्यांचा तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी e-KYC अद्याप केलेली नाही, त्यांनी दि.०७ सप्टेबर 2022 पुर्वी वरील दोन पध्दतीपैकी एका पध्दतीने e-KYC प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आवाहन केले आहे . लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा १००% लाभ घ्यायला हवा. अज्ञानामुळे अनेकदा लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. परिणामी लोकांचे नुकसान होते. संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक प्रसार करण्याकरिता झटायला हवे तसेच लोक प्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या करिता विशेष मोहीम हाती घ्यायला हवी.