





प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई हद्दीत सोपारा गाव व परिसरात २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम चालू असून सदर बांधकामे निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करा. सदर प्रकरणी कारवाई न केल्यास सदरच्या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका प्रशासनाचे संरक्षण लाभले असल्याचे सिद्ध होईल.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ई हद्दीत सोपारा गाव व परिसरात २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम चालू आहे. अशजद ङबरे ,मुसव्वीर ङायर ऊर्फ मुचछु ङायर ,जहिर शेख ऊर्फ (पाव वाला), अ. व. करारी, फराज ङांगे मुजम्मील ङायर ऊर्फ (अण्णा) ईब्राहिम, जुनेद ङायर , आरिफ अन्सारी, आवेश पटेल, फराज ङांगे, शैबाज शेख या आदि भूमाफियांनी सोपारा गाव, सोपारा बुरहान चौक जैनमंदिरजवळ, शखर मोह्ल्ला, नवायत मोहल्ला, खारखंङी मोहल्ला, वाझा मोहल्ला, गास रोङ दफनभुमी समोर, ङांगे वाङी, पुरव वाङी, टाकी पाङा, अमान नगर ईक्रामऊद्दीन बाग, करारी बाग लोहार आळी, भंङार आळी, समेळ पाङा निळेमोरे आदि परिसरात या २२ अनधिकृत इमारतींचे बांधकाम धुमधडाक्यात चालू आहे.
मागील जवळपास ६ महिन्यांपासून बांधकामे चालू असताना महानगरपालिका प्रभाग समिती ई कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रती चौरस फूट २०० रुपये प्रमाणे वसुली केली जात असून मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचविली जात आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही. आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील, उपायुक्त अजित मुठे, सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करून बांधकामधारकांवर एमआरटीपी कायद्यान्वये विना विलंब गुन्हे दाखल करावेत.