शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शहरात घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती. शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला.
घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ सिद्धी पाटील, द्वितीय क्रमांक श्री निलेश चुंबळकर,तृतीय क्रमांक श्री निखिल वाळींजकर आणि उत्तेजनार्थ श्री रुशील पाथरकर व सौ अर्चना दळवी यांना पुरस्कार घोषित करण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी उपशहरसंघटक सौ प्रतिभा ठाकूर, शाखासंघटक सौ विभा दुबे आणि माजी विभागप्रमुख उमेश शिखरे यांनी विशेष योगदान दिले.
पुढच्या वर्षी व्यापक प्रमाणावर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मिलिंद चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *