
प्रतिनिधी : वसई तालुक्यातील गिरीज गावात राहणारी कु. मारिया रणजीत परेरा होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारी व RSKA कराटे अकॅडमी मध्ये शिकणारी मारिया परेरा हिला राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन 2022 मध्ये क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल नॅशनल स्पोर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले. तालुक्यातून व राज्यातून मारिया हिला शुभेच्छांचा वर्षाव झाला. याचे संपूर्ण श्रेय RSKA कराटे अकॅडमी चे मार्शल आर्ट टीचर रितेश प्रजापती व त्यांचे अकॅडमीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले केले व उत्तम प्रकारचे प्रशिक्षण दिल्याबद्दल मला हे यश प्राप्त झाले असे मारिया हिने सांगितले. नॅशनल स्पोर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल वसईचे आमदार मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर व आमदार मा. श्री.क्षितिज ठाकूर आणि मा.श्री.पंकज ठाकूर व वसई तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व मित्रमंडळी यांनी मारिया हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.