

प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून अधिकारी भ्रष्टाचाराची मलाई खात बसले आहेत. प्रती चौरस फूट 200 रुपये प्रमाणे वसुली होत असून मंत्रालयापर्यंत लाचेची रक्कम पोहोचत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटलेले असताना प्रभाग समिती, आयुक्तांसह मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या जातात. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. बाभोळा परिसरात औद्योगिक गाळे, सागरशेत पंप नजीक अवैध गाळे, वसई कोळी वाड्यात अवैध वाढीव बांधकामे, वेलकम हॉटेलचे अनधिकृत वाढीव बांधकाम, भास्कर आळीतील इमारतीचे बांधकाम अशा अनेक बांधकामांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सदर बांधकामांवर कोणतीही कारवाई होत नाही यावरून अधिकारी प्रचंड लाच खाऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याचे सिद्ध होते.
वसई गावात तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इमारतीच्या मोकळ्या जागेवर महफिल हॉटेलचे अनधिकृत बांधकाम चालू आहे. सदर बांधकामाबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र लाच खाऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जात असल्यामुळे कारवाई होत नाही.
अनधिकृत बांधकामांच्या महा भ्रष्टाचारामुळे बांधकामांचे पेव फुटलेले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे प्रचंड महसूल बुडत आहे. मात्र अधिकाऱ्यांना याचे काही सोयर सुतक नाही. अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्या भरत आहेत. एवढा प्रचंड भ्रष्टाचार चालू असताना खुल्लमखुल्ला अनधिकृत बांधकामे होत असताना भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, याचे आश्चर्य वाटते.