

वसई वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत,दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत निर्माण वस्तीस्तर संघा मार्फत वाहन चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहन चालक हा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याची अनन्य साधारण भूमिका आहे. देशाच्या विकासासाठी वाहन चालकाचे योगदान हे महत्व पूर्ण असल्या कारणाने त्याचा योग्य सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे साहेब यांनी -दिनांक १७ सप्टेंबर २०२२हा “वाहन चालक दिन “म्हणून साजरा केला जावा असे आदेश पारित केलेले होते,या दिनाचे औचित्य साधून व निर्माण वस्तीस्तर संघाने वस्तीस्तर संघातील रिक्षाचालक महिलांचा सत्कार तसेच इतर रिक्षाचालक पुरुषवर्गाचा, तसेच वसई विरार महानगर पालिका परिवहन विभागातील बस चालक यांचाही सत्कार केला. व त्याना शुभेच्छा दिला. रिक्षाचालक बंधू आणि भागनींनी व परिवहन विभागातील वाहन चालकानी निर्माण वस्तीस्तर संघांच्या अध्यक्ष-जया कदम, सचिव -योगिता काटे व इतर सदस्य यांचे आभार मानले.तसेच भरारी शहरस्तर संघाच्या सचिव- आम्रपाली साळवे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून चालक वर्गाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.तसेच निर्माण वस्तीस्तर संघामार्फत हा कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून त्याचे अभिनंदन केले.