

मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र 48 वरील जिवघेणे खड्डे बुजविले जात नाहीत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी खनिवडे टोल नाका बंद पाडला. तसेच या खड्ड्यांमुळे मागील तीन महिन्यातील अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणेभुत म्हणून संबंधित टोल कंपनी, दुतुस्ती करणारी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे. आणि जोपर्यंत खड्डे बुजवून होत नाहीत तोपर्यंत टोल वसूल करू नये. असे तक्रार पत्र मांडवी पोलीस ठाण्यात देण्यात आले.
यावेळी श्री समीर वर्तक यांच्यासोबत काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री अभिजित घाग व श्री अम्मार पटेल, वसई विरार पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फुरटॅडो , कार्याध्यक्ष श्री संदीप किणी, उपाध्यक्ष श्री तारिक खान, सरचिटणीस श्री आमिर सय्यद, श्री जमील देशमुख, श्री रोशन वझे, श्री दिनेश वझे, श्री सचिन कुडू,श्री राजेश पाटील, श्री रोहित कीणी, श्री अविनाश किणी व कु. रॉस फुरटॅडो उपस्थित होते.