
नालासोपारा, (प्रतिनिधी)ः नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा येथील करारी मील जवळ रोजच्या येणा-जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने येथील रहिवाश्यांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांना आपले जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून वाट काढत् आहेत.
या परिस्थितीचा सर्वे करून प्रशासनाने मागे दोन महिने अगोदर रस्त्याचे डांबरीकरण केेले होते, पावसाळ्या-दरम्यान केलेले डांबरीकरण व्यवस्थीत न झाल्याने येथेे परत ये रे माझ्या मागल्या चे चित्र दिसून येेत आहे. येथील रहिवाशांना बांधकामाबद्दल जे कंत्राटदारांशी विचारपूस केली असता, त्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही व गटाराची वाढीव पुर्नबांधणी संबंधी चुकीची माहिती दिली. आज ऐन पावसाळ्यात येथे चारही बाजूला रस्तयावर पाणी साचले आहे व काही गटारांची झाकणे ही उघडी व रस्त्यावर पडलेले खड्डे याच्या त्रासावरून स्थानिक रहिवाशी हैरान झालेले आहेत. नाल्यांची स्वच्छतेचे कामे ही व्यवस्थित न झाल्याने रस्त्यावरील पाण्याच्या निचरीकरण व्यवस्थीत होत नाही आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरत आहे. त्यामुळे आरोग्याचे मोठे प्रश्न ही उपस्थित होताना दिसत आहे. तसे रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्यांमुळे लहान मुले-महिला व वृद्ध नागरिकांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या रस्त्यावरून जाण्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.प्रशासन याकडे लक्ष घालून परिस्थिती नियंत्रीत करतील का? व रस्त्यावरचे खड्डे बुजवून व पाण्याचा निचरा लवकरात लवकर विल्हेवाट लावावे, अशी मागणी येथील स्थानिक नागरीक करीत आहे.