
वसई पश्चिम , अंबाडी रोड परिसरातील महानगरपालिकेच्या तरणतलावात बुडून युग लाडवा या लहान मुलाचा मृत्यू झाला त्यावेळी प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रात आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या पालकाशिवाय तिथे कोणीच नव्हते किंबहुना डॉक्टर देखील तिथे आले नव्हते.
आम्ही आरोग्यमंत्री मा . श्री . एकनाथ शिंदे आणि आमदार श्री रविंद्र फाटक यांच्याशी संपर्क साधून सगळी परिस्थिती सांगितले आणि १० मिनीटात पोलिस आणि डॉक्टर आले .
युगचा बुडून झालेला मृत्यू हा ५० रुपयांच्या मलिदा साठी झाला असून महानगरपालिकेने असा ठराव खरोखर पास केला आहे का ? ज्या लोकांना या तलावात प्रवेश घ्यायचा असतो त्यांना डॉक्टरांची शारीरिक तपासणी पत्र लागते आणि ५० रुपये घेऊन ज्यांना प्रवेश दिला जातो त्याबाबत महानगरपालिकेचे धोरण काय आहे. ५० रुपये घेऊन प्रवेश देण्याची परवानगी महानगरपालिकेने दिली होती का ? जर तसे नसेल हा जो भ्रष्टाचार चालायचा त्यामध्ये कोणता अधिकारी आणि नगरसेवक आहे हे उघड होऊन महानगरपालिकेने या तरण तलावाचा ठेका ज्यांना दिला होता त्यांची हा ठेका घेण्यासाठी तांत्रिक योग्यता होती का ? जर नसेल तर ज्या महानगरपालिकेच्या अधिकारी ठेका मंजूर केला ? त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री मिलिंद चव्हाण यांनी पालकमंत्री मा . श्री . रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे केली आहे.