
पालघर/प्रतिनिधी:-
आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर वरून “व्होटर हेल्पलाइन ॲप” इंस्टॉल करा आणि आधारशी मतदार कार्ड जोडणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर यांनी मतदारांना केले आहे .”चला आपली जबाबदारी पार पडूया आजच मतदार व आधार कार्ड जोडा” या घोषवाक्याअंतर्गत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या एका माहिती पत्रकानुसार नागरिकांनी आपले मतदार कार्ड,आधार कार्ड शी लिंक करून घ्यावे यासाठी ॲप डाऊनलोड करण्यासाठी,अँड्रॉइड मोबाईल वरून एक क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगितला आहे. तसेच आपण व्होटर हेल्पलाइन इन्स्टॉल केल्यानंतर समोर येणाऱ्या माहितीनुसार आपण आपला आधार कार्ड मतदार कार्डशी लिंक करून घ्यावा,ज्याद्वारे मतदार याद्या प्रामाणिकपणे कार्यरत होतील आणि याद्यातील दुबार नावे व कळण्यास मदत होणार असल्याने, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पालघर यांनी केले आहे