
प्रतिनिधी :
वसई तहसील कार्यालयात सायंकाळी ६ वाजल्यानंतर भूखंड अकृषिक करण्याची कामे केली जातात. या वेळी दलालांची तहसील कार्यालयात उपस्थिती दिसते.
वसई तहसील कार्यालयात तसा नेहमीच दलालांचा सुळसुळाट दिसतो. अधिकारी थेट नागरिकांकडून पैसे स्वीकारत नसून दलालांच्या माध्यमातून पैसे घेतात. मागील काही दिवसांपासून लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या धाडीमुळे तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार दलालांच्या माध्यमातून होत आहेत. भूखंड अकृषिक करण्याकरिता प्रती फूट प्रमाणे दर आकाराला जात आहे. तहसीलदार, लिपिक यांचे दर ठरलेले असून भूखंड अकृषिक करण्याकरिता लाखों रुपये घेतले जातात.
सायंकाळी ५.४५ वाजता सर्व शासकीय कार्यालये बंद होतात. मात्र वसई तहसील कार्यालयात सायंकाळी ५.४५ वाजल्यानंतर ही व्यवहार चालतात. सायंकाळी ५.४५ वाजल्यानंतर दलालांचा सुळसुळाट पहावयास मिळतो. वरिष्ठ कार्यालयांनी याची दखल घेऊन कारवाई करावी. दलालांना तहसील कार्यालयाचे दरवाजे बंद करावेत. अधिकाऱ्यांना असे वाटत असेल की दलालांच्या माध्यमातून आपण पैसे घेतले तर अडचण येणार नाही. परंतु लाच कशी ही घ्या तुम्ही अडकणारच.