
विनर्स क्लब आयोजित चार दिवसाचे राज्यस्तरीय व्यक्तीमत्व व सर्वोत्कृष्ट वक्ता प्रशिक्षण शिबिर 22 आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डाॅ -बासु माळी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावला येथे नुकताच अत्यंत दिमाखात पार पडले .
राज्यभरातुन सहभागी कतृत्व संपन्न ,हरहुन्नरी व्यक्तीमत्वां मधुन सर्वोत्कृष्ट वक्ता , professional speaker म्हणुन प्रथम क्रमांकाचा बहुमान लर्निंग पाॅवर एज्युकेशन वसई पाणजु गावचे सुपुञ प्रविण अशोक म्हाञे यांना मिळाला त्याबद्दल सर्वस्थरावर कौतुक व अभिनंदनाची थाप प्रविण म्हाञे यांच्यावर पडत आहे.
हा बहुमान लर्निंग पाॅवर संस्थे अंतर्गत विनामुल्य शेअर मार्केट प्रशिक्षण शिबिरात पाच हजार प्रशिक्षणार्थीच्या
जीवनात आमुलाग्र बदल झाल्याचा अभिमान आहे.अशी
भावना प्रसंगी प्रविण म्हाञे यांनी व्यक्त केली