
नालासोपारा :- वसईतील एका इमारतीत काम करणार्या सुरक्षा रक्षकाने इमारतीत राहणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.
आरोपी निखिल पवार (२४) हा वसई पश्चिमेच्या एका इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. याच इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याने फेब्रुवारी महिन्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केले होते. या प्रकरणाची माहिती तिच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी रविवारी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली. वसई पोलिसांनी आरोपी निखिल पवार याला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराच्या कलम ३७६ तसेच बाललैंगिक शोषण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.