महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रमांक – केमाअ २००८/ प्र.क्र.३७८/०८/सहा, दि.२० सप्टेंबर, २००८ अन्वये दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस राज्यात ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज दि.२८ सप्टेंबर, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार येथील मा.महासभा सभागृहात ‘माहिती अधिकार दिना’ निमित्त महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा.उप-आयुक्त श्री.दीपक कुरळेकर तसेच मा.उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांनी उपस्थितांना माहिती अधिकार अधिनियम २००५ व त्याची अंमलबजावणी इ.बाबत उपस्थितांना माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन दिले.