नालासोपारा :- पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याची एक वेगळी ओळख म्हणजे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव होय. या मोहोत्सवाच्या माध्यमातून आता पर्यंत अनेक खेळाडू आणि कलाकार राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवीत आहे. गेल्या दोन वर्षा पासून कोरोनामुळे हा महोत्सव झाला नव्हता. परंतु या वर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि वातावरण बदलत असल्याने, पुन्हा एकदा कला क्रीडा मोहोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु करण्यसाठीची बैठक रविवारी क्रीडा भवनात पार पडली. या बैठकीनंतर खेळाडूमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात कला क्रीडा महोसत्वा बरोबरच महापौर मॅरेथॉन स्पर्धा ही असल्याने खेळाडूंना एक वेगळी पर्वणी मिळणार आहे.

वसई तालुक्याचा सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाचा मापदंड ठरलेला वसई तालुका कला क्रीडा महोत्सव तीस वर्षे व्यवस्थित सुरु होता. परंतु कोरोनामुळे हा महोत्सव गेली दोन वर्षे झाला नव्हता. आता मात्र सर्वच क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सुरु झाल्याने कला क्रीडा महोसत्वाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या महोसत्वात तालुक्यातील ५० हजारांच्यावर खेळाडू सहभागी होत असतात. यात कला आणि क्रीडा विभागात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर रंगणारा हा महोत्सव म्हणजे कलाकार आणि खेळाडू यांना एक वेगळीच पर्वणी असते.

आतापर्यंत या महोसत्वातून ऑलिम्पिकपट्टू आनंद मिनेजीस, कबड्डीस्टार गौतमी राऊत, प्रतीक्षा तांडेल, शरीरसौष्ठवपट्टू दीपक पवार, अभिनेते राजेश उके, अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्या सह जूचंद्र येथील आंतर्रास्थरीय पातळीवर आपल्या रांगोळीने वेगळा ठसा उमटविणार रांगोळी कलाकार पुढे आले आहेत. वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा राज्यशासनाच्या मदतीशिवाय गेली ३० वर्षे अविरत पणे सुरु आहे. आता पुन्हा एकदा हा महोत्सव नव्या जोमात सुरु करण्यासाठी महोसत्वाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या महोसत्वाच्या तयारीसाठी बैठक रविवारी पार पडली. या बैठकीला सरचिटणीस प्रकाश वनमाळी, संघटक सचिव संतोष वळवईकर, चिटणीस केवल वर्तक, माणिकराव दुतोंडे, अनिल वाझ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत खेळाडू , कलाकार आणि महोसत्वाचे कार्यकर्ते यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे वर्ष भरात कला आणि क्रीडा विभागात नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका बाजूला वसईमध्ये कला क्रीडा महोत्सव सुरु असतो तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर असलेल्या ख्रिश्चन समाजाचा नाताळ सण सुरु असल्याने तालुक्यात उत्सवाचे वातावरण असते. तर महोसत्वाच्या शेवटच्या दिवशी मैदानावर जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक गर्दी करत असतात. त्यामुळे त्या रात्री एखादी जत्रा भरल्याचा भास होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *