
नालासोपारा :- शहराच्या श्चिमेकडील वसई विरार महानगरपालिकेचे एकमेव सोपारा सामान्य रूग्णालय आहे.
रुग्णालयावर करोडो रूपये खर्च करून सुसज्ज रूग्णालयात महानगरपालिकेने बांधले आहे. कोणतीही सुविधा नसल्याने रूग्णालय हे रूग्णांसाठी शोभेची बाहुली ठरली आहे. याठिकाणी एम आर आय, सिटी स्कॅन, ईको मशिन तपासणी करण्याची कोणती ही सोय नसल्याने रूग्णांना खाजगी तपासणी सेंटरमध्ये पाठवुन टक्केवारी घेण्याचे काम येथील डॉक्टर घेत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या रूचिता नाईक यांनी केला आहे. तसेच रूग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे.
सोपारा सामान्य रूग्णालयात रूग्णांना आत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी शासनाकडुन आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून येथील गोरगरीब जनतेला उपचार घेण्यास मदत होईल. मात्र असे असताना सदर रुग्णालयातील एम आर आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशिन सुरू करण्यास विलंब होत असल्याने त्यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या रूग्णांना तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते अशाना नाईलाजाने खाजगी रूग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहे.
यामुळे रूग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रूग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा करेन अपमानास्पद वागणूक दिली जाते.
रूग्णांना उदभवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करून तातडीने रुग्णालयातील एम आर आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशिन सुरू करण्याबाबत व तातडीने रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत कॉंग्रेसच्या रूचिता नाईक यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली. याबाबत आयुक्तांनी तातडीने रिक्त पदे भरून मशिन बसवण्याचे आश्वासन दिले आहे.