मिरा रोड – डॉ. मयुरेश प्रधान, सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टिमने वसई येथे राहणार्‍या श्री डे या 56 वर्षीय पुरुषाला नवे आयुष्य बहाल केले. शारीरीक परिश्रमानंतर छातीत दुखणे या तक्रारीने ते रुग्णालयात उपचाराकरिता आले होते. कोरोनरी अँजिओग्राम चाचणीत त्यांना गंभीर कॅल्सिफिक टीव्हीडी (ट्रिपल वेसल डिसीज) असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर कोरोनरी धमनीची बायपास शस्रक्रिया करण्यात आली.

वसईत राहणारे श्री. संजय डे हे शारीरीक परिश्रमामुळे छातीत दुखणे, अशक्तपणा, धमनी रोग, आदी समस्यांनी ग्रासले होते. सीएजी चाचणी (कोरोनरी अँजिओग्राम) घेतली ज्यामध्ये त्यांना गंभीर कॅल्सिफिक टीव्हीडी (ट्रिपल वेसल डिसीज) असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णावर कोरोनरी धमनीची बायपास शस्रक्रिया करण्यात आली जी डॉ. मयुरेश प्रधान (सीव्हीटीएस सर्जन), डॉ मृदुल धरोड (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट), डॉ दीपेश पिंपळे (न्यूरोलॉजिस्ट) आणि डॉ अनुप ताकसांडे (हृदयरोगतज्ज्ञ) या टिमने रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया करुन त्याना नवे आयुष्य बहाल केले.

15 वर्षांहून अधिक काळ 2,500 हून अधिक बायपास शस्त्रक्रिया करणारे डॉ प्रधान आता वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे कार्यरत आहेत. डॉ मयुरेश प्रधान, सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन,, मीरा रोड सांगतात दर महिन्याला हृदयाच्या तक्रारी असलेल्या सरासरी 15 रुग्णांचे निरीक्षण करत आहोत. जीवनशैलीसंबंधी विकार, ताणतणाव, आहाराच्या चूकीच्या सवयी, झोप न लागणे आणि अनेक कारणांमुळे सर्व वयोगटात हृदयविकाराचा त्रास होतो. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची टिम, दर्जेदार सेवासुविधा तसेच रुग्णाच्या आरोग्य व्यवस्थापनाकरिता लागणाऱ्या सर्वच सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

बायपास सर्जरीमध्ये सामान्यत: हृदयाचे कार्य थांबणे आणि हृदय-फुफ्फुसाच्या मशीनचा वापर करणे गरजेचे आहे. अलीकडे, हृदयाचे ठोके सुरु ठेवत बायपास शस्त्रक्रिया करण्याची एक अभिनव पद्धत विकसित करण्यात आली आहे. ऑन-पंप कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजी) शस्त्रक्रिया हे यामागचे मूळ तंत्र आहे, तसेच ऑफ-पंप किंवा बीटिंग हार्ट सर्जरी अशा तंत्राचा देखील वापर केला जातो. हृदयाच्या रूग्णांमध्ये मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजारांच्या वाढत्या घटनांमुळे, ऑन-पंप किंवा पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ऑफ-पंप सीएबीजी अधिक सुरक्षित आहे आणि कमी गुंतागुंतीची आहे. शस्त्रक्रियेचा चांगला परिणाम झाला असून रुग्णाच्या हृदयाचा ठोका निरोगी आहे. तो आता सामान्य आहार घेत आहे.

या प्रकरणाच्या गुंतागुंतीबद्दल भाष्य करताना डॉ प्रधान सांगतात की, बायपास शस्त्रक्रिया हृदय थांबवून तसेच हृदय-फुफ्फुसाच्या मशीनद्वारे केली जाते. परंतु आता आधुनिक पद्धत, ज्याला ऑफ-पंप किंवा बीटिंग हार्ट सर्जरी सीएबीजी म्हणतात यात हृदयाचे कार्य न थांबविता बायपास शस्त्रक्रिया केली जाते. आणि हृदयाच्या रूग्णांमध्ये मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजारांच्या वाढत्या घटनांमुळे, ऑन-पंप किंवा पारंपारिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत ऑफ-पंप सीएबीजी अधिक सुरक्षित आहे आणि कमी गुंतागुंत आहे.

शारीरक कष्टामुळे मला छातीत दुखायचे आणि त्यामुळे माझ्या दैनंदिन कामातही अडथळा येत होता. मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमचे आम्ही आभारी आहोत ज्यामुळे आता माझे पती त्यांची दैनंदिन कामे स्वतः करु शकत आहे अशी प्रतिक्रिया रुग्णाची पत्नी श्रीमती डे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *