
समता फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ मिलेनियम चॅरिटेबल ट्रस्ट , मुंबई व लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स यांच्या संयुक्त विद्यमाने तिल्हेर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय, तिल्हेर या विद्यालयातील लांबून शाळेत येणाऱ्या गरीब, होतकरू आणि गरजू अशा दहा विद्यार्थ्यांना गुरूवार दि. २६ सप्टेंबर, २०२२ रोजी ” सायकल बॅंक ” योजनेतून सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सचे अध्यक्ष लायन यशवंत जाधव, माजी अध्यक्ष लायन ललित शिंगरे, सेवा अध्यक्ष लायन अंजली मेस्त्री, लायन श्रेयस प्रताप, समता फाउंडेशनचे प्रतिनिधी मा. श्री. मनिष शेंडे सर, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. हरड सर, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स करिता
लायन दिलीप अनंत राऊत
चेअरपर्सन
मार्केटिंग अँड कम्युनिकेशन
9850833848
draut12@gmail.com