
रविवार दिनांक ०२/१०/२०२२
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ५:०० पर्यंत
ठिकाण : लोकसेवा केंद्र, गाळा नं.५ ममता टॉवर, पी.पी. मार्ग, पुष्पा नगर एस. टी. बस स्थानकाच्या पुढे, सार्थक हॉस्पिटलच्या समोर, विरार पश्चिम.
समाजकल्याण विभाग, जिल्हापरिषद, पालघर आणि वसई विरार शहर महानगरपालिका – दिव्यांग विभाग आणि अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेकडे प्राप्त झालेले
विरार, नालासोपारा, वसई, नायगाव परिसरातील दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड वाटप करण्यात येत आहेत.
वसई तालुक्यातील दिव्यांगांचे युडीआयडी कार्ड वाटप करण्याची जबाबदारी आपल्या अपंग कल्याणकारी संस्थेने घेतली आहे. बोळींज येथील शाळेतुन आणि पाचुबंदर, वसई येथील शाळेतुन तसेच काही नवीन युडीआयडी कार्ड समाजकल्याण विभाग, जिल्हापरिषद यांच्या कार्यालयातुन प्राप्त झाले आहेत. या कार्डांची यादी exel file आणि नंतर पीडीएफ मध्ये तयार करण्याचे काम पुर्ण झालेले आहे. टप्या टप्प्याने हे कार्ड वाटप करण्यात येणार आहेत.
सोबत सर्व पीडीएफ फाईल जोडण्यात आल्या आहेत, यात आपले नाव शोधावे, पीडीएफ open केल्यावर आपलं नाव सर्च करा.. सर्च option ला जाऊन आपले नाव काही सेकंदातच माहिती करता येते. आपणांस सर्च करणे जमत नसेल तर कुणाचेतरी सहकार्य घेऊन आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे माहिती करुन घ्या. आपले नाव असल्यास आपण उपरोक्त ठिकाणी वेळेवर उपस्थित राहुन आपले कार्ड घेऊन जावे परंतु आपले नाव नसल्यास कृपया आपण येऊ नये ही नम्र विनंती यापुढेही कार्ड वाटपाचे काम आता सतत सुरु राहणार आहे. त्यामुळे यादीत आपले नाव असेल तरच कृपया आपण यावे, अन्यथा येऊ नये ही पुनश: नम्र विनंती.
अपंग व्यक्तीने येताना सोबत आधारकार्ड झेरॉक्स आणावे. अपंग व्यक्तीस येणे शक्य नसेल तर घरातील येणाऱ्या व्यक्तीने अपंग व्यक्तींचे आधारकार्ड आणि स्वत:चे आधारकार्ड व रेशनिंग कार्ड आणावे रेशनिंग कार्डवर कार्ड घेण्यास येणारी व्यक्ती व अपंग व्यक्ती दोघांची नावे असणे आवश्यक आहेत. अपंग स्वतः: कार्ड घेण्यासाठी येत असतील तर त्यांनी फक्त आधारकार्ड झेरॉक्स सोबत आणावी.
धन्यवाद!
टिप : हे कार्ड तसे साधारणत: एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जुने आहेत. त्यामुळे ज्यांचे नाव असेल त्यांनीच यावे, ज्यांचे नाव यादीत नसेल त्यांनी कृपया येऊ नये ही नम्र विनंती
अधिक माहितीसाठी संपर्क
(शक्य तो फक्त व्हाट्सअप वर आपले प्रश्न विचारा ही विनंती) 9503793629