
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती त्यानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अर्नाळा येथील पवित्र वैतरणा संगमाचे ठिकाण जिथे दिनांक 8 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थींचे विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले होते त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तसेच या वंदनीय स्मारकाशेजारी वटवृक्षाचे वृक्षारोपणही केले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण किनारपट्टीवरील कोळी व भूमीपुत्रांद्वारे वाढवण येथील केंद्र सरकारने लादलेले कोळी बांधव, भूमिपुत्र आणि पर्यावरणाला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी बंदराच्या विरोधात निघालेल्या रॅलीमध्येही श्री समीर वर्तक व सर्व सहकारी सहभागी झाले.
यावेळी श्री समीर वर्तक यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि युवभारत संस्थेचे श्री शशी सोनवणे, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे व श्री अभिजीत घाग, वसई विरार जिल्ह्याचे पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो व सरचिटणीस श्री आमिर सय्यद, आस्था सेवा संस्थेचे अध्यक्ष व निर्भीड पत्रकार श्री वसीमभाई शेख, अर्नाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री रविंद्र पालकर व श्री शिवदास कांबळे तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या स्मरकास भेट देण्यासाठी आलेले माझे मित्र श्री दयानंद भोईर व श्री कपिल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.



