वसई :-वसईच्या चंद्रपाडा येथील कॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बुधवारी हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन ३ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता तर १० कामगार जखमी झाले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी शुक्रवारी दोन कंपनी मालक, मॅनेजरवर निष्काळजीपणामूळे मरणास कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉस पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनीत हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये अजय बदर, संदीप मिश्रा, अश्विन पटेल या तीन कामगारांचा स्फोटामुळे छिन्न विछन्न जखमा होऊन शरीर भाजून मृत्यू झाला तर विकास यादव, दिनेश कोळी, जमुना प्रसाद, जयदीप राव, घनश्याम साहनी, सागर पितळे, हर्षला पडवळे यांना गंभीर दुखापत आणि सखाराम मोरे, नितेश सोबले, कनक जैस्वाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी शनिवारी कंपनी मालक फिलिक्स कदम (४६), ओसवल्ड डिसोझा (६०) आणि मॅनेजर अशोक गोपाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *