वसई विरार: वसई विरार महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बघा वसई विरार नालासोपारा शहरात प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे पेशंट हि त्याप्रमाणे जास्त असणे सहाजिकच आहे, पण हे चित्र पहिल्या नंतर दिसतं कि हे वसई शहरात नाही एका दुर्गम भागात असलेल्या आरोग्य केंद्रात कोणी पेशंट नसल्याने झोपा काढल्या जातात. आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण ही घटना आहे वसई पूर्वेकडील आरोग्य केंद्र, नवघर येथील डॉ. सुनीता पटेल या चक्क झोपल्या आहेत.
हे असं का घडतं थोडं मेंदूला जोर दिला की उत्तर सापडेल. तर याला कारणीभूत आहेत येथील खाजगी रुग्णालयाशी डॉक्टरांचे असलेलं अर्थपूर्ण व्यवहार. काही टक्क्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्या मर्जीतील खाजगी डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये पाठवले जाते.

यामुळेच काही पेशंट परवडत असेल तर खाजगीत, नाहीतर सरळ मुंबईची वाट पकडतात. यामुळेच लोकलच्या गर्दीत वाढ होते. मनपा आरोग्य केंद्रातुन सरास असे प्रकार घडतात याकडे कोण गांभीर्याने पहात नाही. मनपाकडुन डॉक्टरांना समाधानकारक वेतन मिळते तरीही यांच कधी समाधान होत नाही म्हणून असे मार्ग अवलंबतात. जनसेवेसाठी डॉक्टर ची नोकरी करतो असे भासवायचे व अप्रत्यक्षपणे धनसंचय कसा होईल याकडे जास्त लक्ष असते. यासाठी मनपाकडून जनजागृती व्हावी व तळागाळातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी जास्तीत जास्त शिबिराचे आयोजन करावे. जेणेकरून या सुस्त डॉक्टरांना काम करण्याची सवय राहील व लोकांचा मनपा आरोग्य सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *