


मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तलायच्या अंतर्गत वाहतूक विभागाला स्वतंत्र सहाय्यक आयुक्त(वाहतूक विभाग) म्हणून नेमणूक केलेली जरी असली तर त्यांचे लक्ष वसई विरार शहरात नसल्याने अनेक वाहतुकीची समस्या अनेक महिन्यापासून निर्माण होत आहेत, तर वाहतूक विभागच्या अंतर्गत असणारे परिमंडळ-०२ आणि परिमंडळ-०३ चे वाहतूक नियंत्रण अधिकारी निव्वळ बे कायदेशीर वाहतूक धारणा शहरात अभय देत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत,
अशाच एक प्रकार गेली अनेक दिवस नालासोपारा पश्चिमला उड्डाणपूलाच्या खाली काही वर्षातपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखा परिमंडळ-०२ च्या अंतर्गत वाहतुकीवर नियंत्रण असावे व त्याकरिता नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना एक बसण्याचे आणि कारवाई केलेल्या वाहनधारकांना प्रत्यक्ष भेटात यावे या उद्देशाने बिट चौकीची उभारण्यात आलेली होती, परंतु मागील काही दिवसांपासून कर्तव्य बजावत असणारे रातपाळीचे वाहतूक अंमलदार यांनी बिट चौकीच्या कुलुपाची चावी फेरीवाल्यांच्या हातात सुपूर्द करून फेरीवाले विक्री करत असणाऱ्या वस्तू बिनधास्तपणे वाहतूक बिट चौकीत रात्रीच्या वेळी ठेवत असून आतां रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांचा बिट चौकीवरती कब्जा होत आहे.
ह्या संदर्भात नवनिर्माण रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक मालक संघटनेचे नालासोपारा पश्चिमचे शहर अध्यक्ष-रोहन नेरुळकर यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली आहे.